Share Market Closing: शेअर बाजारातील 5 दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 74,000च्या खाली, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Today: आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 74,000 च्या खाली गेला. सेन्सेक्स 443 अंकांनी घसरला आणि 73,896 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 22,500 च्या खाली आला.
Share Market Closing
Share Market ClosingSakal

Share Market Closing Latest Update 26 April 2024: आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 74,000 च्या खाली गेला. सेन्सेक्स 443 अंकांनी घसरला आणि 73,896 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 22,500 च्या खाली आला. निफ्टी निर्देशांक 0.52% घसरला आणि 22,452 अंकांवर बंद झाला. NSE वर बजाज फायनास सात टक्क्यांहून अधिक घसरला. तर टेक महिंद्रा सर्वाधिक तेजीत होता.

Share Market Today
Share Market TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

आज शेअर बाजारात मिडकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली, त्यामुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 50,684 अंकांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आणि 395 अंकांच्या उसळीसह 50,624 अंकांवर बंद झाला. एनएसईच्या स्मॉलकॅप इंडेक्सनेही 17,000 चा टप्पा ओलांडला आणि 17,051 अंकांवर पोहोचला.

Share Market Closing
Gen Z Loosing Jobs : धक्कादायक! नव्याने पदवीधर झालेल्या तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?
Share Market Today
Share Market TodaySakal

मात्र, बाजार बंद झाल्यानंतर निर्देशांक 94.50 अंकांच्या उसळीसह 16,981.30 अंकांवर बंद झाला. याशिवाय आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस आणि हेल्थकेअर शेअर्स आजच्या व्यवहारात तेजीसह बंद झाले. बँकिंग, वाहन, ऊर्जा, मेटल शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 6 शेअर्स वाढीसह आणि 24 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स घसरले?

आजच्या व्यवहारात टेक महिंद्रा 7.43 टक्के, Divi's Lab 4.49 टक्के, LTI Mindtree 3.31 टक्के, Bajaj Auto 2.74 टक्के, BPCL 1 टक्के वाढीसह बंद झाले. घसरणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स 7.73 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह 3.52 टक्क्यांनी, नेस्ले 3.12 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
LIC Cuts Stake: एलआयसीने 16 सरकारी कंपन्यांमधील हिस्सा केला कमी; काय आहे कारण?
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

तवणूकदारांच्या संपत्तीत 13 हजार कोटींची वाढ

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण होऊनही मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे मार्केट कॅप विक्रमी पातळीवर बंद झाला. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 404.22 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील ट्रेडिंग सत्रात 404.09 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 13 हजार कोटींची वाढ झाली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,913 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,011 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,773 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

तर 129 शेअर्स कोणतीही हालचाल न करता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 252 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 16 शेअर्सनी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com