Share Market Opening: शेअर बाजारावर युद्धाचा परिणाम; सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले, चौफेर विक्रीचा दबाव

Sensex-Nifty Today: सोमवारी शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम बाजारावर झाला आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदार सावध आहेत.
Share Market Opening
Share Market OpeningSakal

Share Market Opening Latest Update 15 April 2024 (Marathi News): सोमवारी शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम बाजारावर झाला आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदार सावध आहेत.

सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी घसरून 73,650 वर आला. निफ्टीही 150 अंकांनी घसरला असून तो 22,300 च्या पातळीवर आहे. ऑटो, मेटल, फार्मा यासह इतर सर्व क्षेत्रात विक्री होत आहे.

Sensex Today
Sensex TodaySakal

शनिवारी आणि रविवारी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. इराणने इस्रायलमधील अनेक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केल्याने जगभरात तणाव वाढला आहे.

त्याचबरोबर येणारा काळ खूप कठीण जाणार असल्याचे मानले जात आहे. विशेषत: कच्च्या तेलाच्या किमती आणि महागाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे.

Nifty Today
Nifty TodaySakal

सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

बीएसई सेन्सेक्स घसरला असून 30 पैकी फक्त 3 शेअर्स वधारत आहेत आणि 27 शेअर्स घसरत आहेत. टीसीएस, नेस्ले, एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. टाटा मोटर्स, टाटा स्टील, एसबीआय, एनटीपीसी, पॉवर ग्रिड यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

निफ्टीचे केवळ 4 शेअर्स वधारत आहेत

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 46 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत आणि केवळ 4 शेअर्स तेजीत आहेत. हिंदाल्को, ओएनजीसी, टीसीएस आणि नेस्ले यांचे शेअर्स केवळ वाढीसह व्यवहार करत आहेत आणि इतर सर्व शेअर्समध्ये घसरण होत आहे.

NSE
NSESakal
Share Market Opening
‘इंडेक्स’ची रेसिपी

आशियाई बाजार घसरले

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. शुक्रवारी सुमारे एक टक्क्यांची घसरण झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाजारातील घसरणी दरम्यान कंपन्यांचे तिमाही निकाल बाजारात तेजी आणू शकतात. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी आणि इस्रायल आणि इराणमधील ताज्या वादामुळे शेअर बाजाराच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Share Market Opening
CAG Report: सरकारी कंपन्यांचा तोटा ३,६२३ कोटी रुपये; तोट्यातील कंपन्या बंद करण्याची सूचना

'या' क्षेत्रांमध्ये सर्वाधिक घसरण

सेन्सेक्स-निफ्टी व्यतिरिक्त, निफ्टी नेक्स्ट 50, मिडकॅप, स्मॉल कॅप आणि वित्तीय सेवा निर्देशांकातही मोठी घसरण झाली आहे. बँक निफ्टी आज 550 हून अधिक अंकांनी घसरला आहे. तर निफ्टी नेक्स्ट 50 1400 हून अधिक अंकांनी घसरला आहे.

बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, प्रायव्हेट बँक, मेटल, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअरमध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. मीडिया क्षेत्रात सर्वाधिक 3.21 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटींचे नुकसान

12 एप्रिल रोजी कंपन्यांचे मार्केट कॅप 399.67 लाख कोटी रुपये होते. आज मार्केट कॅप 8.21 लाख कोटी रुपयांनी घसरून 391.46 लाख कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com