Share Market Opening: शेअर बाजार लाल रंगात उघडला; बँक निफ्टी 48,900च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Opening: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू झाले. बँक निफ्टी 48,900 च्या जवळ व्यवहार करत होता. सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. व्यवहाराच्या सुरुवातीला निफ्टीमध्ये सुमारे 100 अंकांची आणि बँक निफ्टीमध्ये 250 अंकांची घसरण झाली.
Share Market Updates
Share Market Updates Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 29 May 2024: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू झाले. बँक निफ्टी 48,900 च्या जवळ व्यवहार करत होता. सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. व्यवहाराच्या सुरुवातीला निफ्टीमध्ये सुमारे 100 अंकांची आणि बँक निफ्टीमध्ये 250 अंकांची घसरण झाली.

सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला आणि 74,870 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 22800 च्या खाली होता. सकाळपासून जागतिक बाजारातून घसरण होण्याची चिन्हे आहेत. गिफ्ट निफ्टी 111 अंकांनी घसरला. अमेरिकन फ्युचर्स देखील लाल रंगात व्यवहार करत होते.

Share Market Latest Update
Share Market OpeningSakal

निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते. निफ्टी ऑटो निर्देशांक सुमारे एक टक्का घसरत होता तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक किरकोळ घसरला होता.

शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये हिंदाल्को, भारती एअरटेल, टाटा स्टील, आयटीसी, कोटक बँक, डिवीज लॅब आणि सन फार्मा या शेअर्सचा समावेश होता, तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये एसबीआय लाईफ, महिंद्रा, बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, इंडसइंड यांचा समावेश होता.

Share Market Updates
Adani-Paytm Deal: गौतम अदानी बनणार पेटीएमचे पार्टनर; फिनटेक क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत
Share Market Latest Update
Share Market OpeningSakal

सेन्सेक्सचे केवळ 7 शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी फक्त 7 शेअर्स तेजीत आहेत. सन फार्मा, बजाज फायनान्स आणि नेस्लेमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, M&M, टेक महिंद्रा आणि JSW स्टीलमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे.

Share Market Latest Update
S&P BSE SENSEXSakal

सध्या BSE वर 2407 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1061 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 1227 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 119 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 54 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 20 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 64 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 60 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

Share Market Updates
Raghuram Rajan: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास अर्थव्यवस्थेचं काय होणार? रघुराम राजन म्हणाले...

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.26 लाख कोटी रुपयांची घसरण

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजेच 28 मे 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 4,16,92,249.69 कोटी होते. आज म्हणजेच 29 मे 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,15,66,148.38 कोटी रुपयांवर पोहचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,26,101.31 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com