Share Market Today: देशांतर्गत बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण होईल का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजारात प्रॉफीट बुकिंगचा दबाव दिसून आला. निफ्टी रियल्टी आणि मेटल्स अनुक्रमे 3.5 टक्के आणि 2.4 टक्क्यांनी घसरले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 384 अंकांनी घसरला आणि 73,512 वर बंद झाला.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजारात प्रॉफीट बुकिंगचा दबाव दिसून आला. निफ्टी रियल्टी आणि मेटल्स अनुक्रमे 3.5 टक्के आणि 2.4 टक्क्यांनी घसरले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 384 अंकांनी घसरला आणि 73,512 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 140 अंकांनी घसरून 22,303 वर बंद झाला. बँक निफ्टी 610 अंकांनी घसरून 48285 वर बंद झाला. मिडकॅप 988 अंकांनी घसरून 49674 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

चांगल्या जागतिक संकेतांदरम्यान मंगळवारी सकाळी देशांतर्गत बेंचमार्क इंडेक्स वाढीसह उघडले. मात्र, सुरुवातीच्या वाढीनंतर बाजारात मोठ्या प्रमाणात प्रॉफिट-बुकिंग झाले असे असित सी. मेहता इन्व्हेस्टमेंट इंटरमीडिएट्सचे विश्लेषक हृषिकेश येडवे म्हणाले.

तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीने गेल्या आठवड्यात बियरिश इंगल्फिंग कँडल तयार केला होता जे कमकुवतपणाचे लक्षण आहे. निफ्टी या बियरिश इंगल्फिंग कँडलच्या टोकाच्या आणि 34 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एवरेजच्या सपोर्टच्या खाली बंद झाला.

यामुळे बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. 22,100-22,000 च्या पातळीवर निफ्टीला ठोस सपोर्ट मिळण्याची आशा आहे. त्याच वेळी, वरच्या बाजूस त्याला 22,800 वर रझिस्टंस सहन करावा लागू शकतो. एकूणच, शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 22,000-22,800 च्या रेंजमध्ये कंसोलिडेट होईल असे ते म्हणाले.

बँक निफ्टी इंडेक्स वाढीसह उघडला परंतु विक्रीच्या प्रचंड दबावामुळे तो 48,285 च्या पातळीवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या, साप्ताहिक आधारावर, बँक निफ्टीने त्याच्या सर्वकालीन उच्चांकाजवळ एक शूटिंग स्टार कँडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे, जे 49,975 च्या जवळ मजबूत रझिस्टंस दर्शवते.

शिवाय, बँक निफ्टीने गेल्या आठवड्यातील 48,342.7 चा नीचांक तोडला. जोपर्यंत हा इंडेक्स 48,340 च्या खाली राहील तोपर्यंत तो घसरत राहील आणि ही घसरण 48000-47,700 पर्यंत वाढू शकते. शॉर्ट टर्ममध्ये 48,000 आणि 47,700 ची पातळी बँक निफ्टीला सपोर्ट म्हणून काम करेल तर 49,000 आणि 50,000 वर रझिस्टंस दिसून येईल.

Share Market Investment Tips
Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • पॉवर ग्रीड (POWERGRID)

  • ओएनजीसी (ONGC)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • लुपिन लिमिटेड (LUPIN)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • आयडिया (IDEA)

Share Market Investment Tips
Indraprastha Gas Ltd Dividend : इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून डिव्हिडेंडची घोषणा, मार्च तिमाहीत नफ्यात वाढ...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com