Shares of Kajaria Ceramics : कजारिया सिरॅमिकचे शेअर्स येत्या काळात देतील भरघोस परतावा...

सध्या शेअर बाजारात घसरण सुरू आहे. या काळात अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्सही बाजारात घसरले आहेत. या घसरणीदरम्यान, गुंतवणूकदारांनी घाबरून विक्री करू नये असा सल्ला बाजारातील तज्ज्ञ देत आहेत.
Shares of Kajaria Ceramics
Shares of Kajaria Ceramicssakal

सध्या शेअर बाजारात घसरण सुरू आहे. या काळात अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्सही बाजारात घसरले आहेत. या घसरणीदरम्यान, गुंतवणूकदारांनी घाबरून विक्री करू नये असा सल्ला बाजारातील तज्ज्ञ देत आहेत. अशात ब्रोकरेज हाऊसेस घसरणीच्या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी कजारिया सिरॅमिक ( Kajaria Ceramic) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर कजारिया सिरॅमिक्सच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे. सध्या हा शेअर 1188 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, स्टॉकमध्येही काही काळापासून घसरण दिसून येत आहे. एका महिन्यात स्टॉकमध्ये 4% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. पण तरिही हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज हाऊस देत आहेत. मागील एका वर्षाचा विचार केल्यास स्टॉकने 13% परतावा दिला आहे. एनएसईवर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1523.80 रुपये आहे आणि तर नीचांक 1006.50 रुपये आहे.

मोतीलाल ओसवाल यांनी आता कजारिया सिरॅमिक्सला बाय रेटिंग दिले आहे. आपल्या रिसर्च रिपोर्ट ब्रोकरेजने म्हटले आहे की, रिअल इस्टेट क्षेत्रातील मजबूत मागणी आणि बांधकाम क्रियाकलाप वाढल्यामुळे आर्थिक वर्ष 2015 मध्ये टाइल्सची खरेदी सुधारण्याची अपेक्षा आहे. यासोबतच मोरबी, गुजरात इथेथे 6 एमएसएम क्षमतेसह टाइल्स उत्पादन सुविधा संपादन करण्याची घोषणा केली. कंपनी बाथवेअर आणि प्लायवूड विभागांमध्येही क्षमता वाढवत आहे. यासोबतच ब्रोकरेज हाऊसच्या माध्यमातून शेअरवर 1600 रुपयांचे टारगेट निश्चित करण्यात आले आहे.

Shares of Kajaria Ceramics
IPO Open : विश्वास ॲग्री सीड्सचा आयपीओ 21 मार्चपासून खुला होणार, अधिक जाणून घेऊयात...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com