

New Investment Trend Alert! Could SIF Be the Next Big Wealth Creator for Investors?
eSakal
लेखक - निरंजन अवस्थी, वरिष्ठ उपाध्यक्ष(एसव्हीपी), एडलवाईस म्युच्युअल फंड
भारतात गुंतवणुकीचे क्षेत्र संथ गतीने परंतु अतिशय सकारात्मक पध्दतीने बदलताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून, गुंतवणूकदारांना प्रामुख्याने दोन पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागत होती आणि ते दोन पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) हे होते. या दोन्ही पर्यायांमधील फरक अगदी स्पष्ट आहे. म्युच्युअल फंडामध्ये नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे सुरक्षितता, प्रमाणीकरण आणि सुलभता मिळते. तर दुसरीकडे पीएमएसमध्ये लवचिकता, योग्य साधनांमध्ये गुंतवणूक त्याचबरोबर अधिक वैविध्यपूर्ण धोरणे राबवण्याची क्षमता मिळते. या दोन्ही पर्यायांत असलेली ही दरी भरून काढण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झालाय त्याचे नाव विशेष गुंतवणूक निधी म्हणजेच 'स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स' (एसआयएफ).