DMart : डी-मार्ट (शुक्रवारचा बंद भाव : रु. ४,५२९)

नित्योपयोगी वस्तुंची सवलतीच्या दरात विक्री करणारी राधाकृष्ण दमानी यांची ‘डी-मार्ट’ म्हणजेच ‘ॲव्हेन्यू सुपर मार्ट्‌स लि.’ ही कंपनी अत्यंत लोकप्रिय आहे. या कंपनीची स्थापना २००० मध्ये झाली. गेल्या तिमाहीमध्ये कंपनीने पाच नवी स्टोअर सुरू केली.
stock analysis of dmart share price investment
stock analysis of dmart share price investmentSakal

नित्योपयोगी वस्तुंची सवलतीच्या दरात विक्री करणारी राधाकृष्ण दमानी यांची ‘डी-मार्ट’ म्हणजेच ‘ॲव्हेन्यू सुपर मार्ट्‌स लि.’ ही कंपनी अत्यंत लोकप्रिय आहे. या कंपनीची स्थापना २००० मध्ये झाली. गेल्या तिमाहीमध्ये कंपनीने पाच नवी स्टोअर सुरू केली.

२९ मार्च २०२४ पर्यंत तिची महाराष्ट्र, गुजरात, दमण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये मिळून एकूण ३६२ स्टोअर आहेत. कंपनीने स्टोअरच्या विस्तारामध्ये क्लस्टर आधारित दृष्टीकोन स्वीकारला आहे.

जवळपासच्या क्षेत्रांतील सर्व मागणी पूर्ण करणाऱ्यासाठी कंपनी सामान्यत: एक प्रमुख वितरण केंद्राचा वापर करते. अशा प्रकारे कंपनी कार्यक्षमतेने खर्चाचे व्यवस्थापन करत ग्राहकांना सर्वोत्तम किंमत वितरीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

ऑनलाइन खरेदी-विक्रीचा वाढता ट्रेंड आणि स्पर्धकांचा धोका ओळखून कंपनीने उपलब्ध वस्तूची ऑनलाइन विक्री करण्यासाठी ‘डी-मार्ट रेडी’ची सुरुवात केली. ज्या शहरांमध्ये कंपनीचे स्टोअर आहेत, तिथे ‘डी-मार्ट रेडी’ आहे.

ऑक्टोबर २०२३ पर्यंत कंपनीने ‘डी-मार्ट रेडी’चा २२ शहरांमध्ये विस्तार केला आहे. कंपनी व्यवसायवृद्धीसाठी प्रायोगिक तत्वावर उपकंपनी रिफ्लेक्ट हेल्थकेअर व रिटेल प्रा. लि.च्या माध्यमातून ‘डी-मार्ट’ स्टोअरमध्ये फार्मसी शॉप-इन-शॉप सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.

गेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीने ६९० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे १६ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीचा महसूल सुमारे १७ टक्क्यांनी वाढून १३,५७२ कोटी रुपये झाला आहे.

मागील तीन तिमाही निकालानुसार, एकूण निव्वळ नफा सुमारे १९७२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भांडवल व कर्जाचा विचार करता भांडवलाचे प्रमाण जास्त आहे. कंपनी भांडवलावर मागील अनेक वर्ष १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत आहे.

या कंपनीच्या शेअरने ऑक्टोबर २०२१ मध्ये ५,९०० रुपये या उच्चांकावरून मे २०२२ पर्यंत सुमारे ४६ टक्के घसरण दर्शविली. यानंतर त्यात मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दिसत आहे. आगामी काळात या शेअरने ४,६०९ रुपये या पातळीच्या वर बंद भाव दिल्यास आलेखानुसार तेजीचे संकेत मिळू शकतील.

किमतीच्या दृष्टीने हा शेअर सध्या महाग वाटत असला, तरी व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेता या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी मर्यादित गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com