
Stock Market Closing Today: शेअर बाजाराने सलग चार दिवस दमदार तेजी दाखवल्यानंतर आज म्हणजेच सोमवारच्या व्यवहारात बाजाराला ब्रेक लागला. गुंतवणूकदारांनी मोठ्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली आणि त्यामुळे बाजार लाल रंगात बंद झाला.
एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. याचा थेट परिणाम निर्देशांकांवर झाला आणि बाजारात घसरण दिसून आली.