Stock Market Crash: शेअर बाजारात त्सुनामी! गुंतवणूकदारांचे 21 लाख कोटींचे नुकसान, बाजार 5 ट्रिलियन डॉलरच्या खाली

Share Market Investors Loss: एक दिवस आधी झालेल्या नेत्रदीपक वाढीनंतर आज मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी बाजार तोंडघशी पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालांच्या सुरुवातीच्या ट्रेंडने बाजाराच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.
Stock Market Crash
Stock Market CrashSakal

Share Market Investors Loss: एक दिवस आधी झालेल्या नेत्रदीपक वाढीनंतर आज मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी बाजार तोंडघशी पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालांच्या सुरुवातीच्या ट्रेंडने बाजाराच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. त्यामुळे बाजारात जोरदार विक्री होत असून गुंतवणूकदारांना 21 लाख कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे.

आज सकाळी बाजारात मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स उघडताच 1 हजार पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता. लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर आले, तसतसे शेअर बाजारात घसरण सुरू झाली. सकाळी 9.55 वाजता सेन्सेक्स सुमारे 1500 अंकांनी घसरला होता आणि 75 हजार अंकांच्या खाली व्यवहार करत होता.

निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील निकराच्या लढतीत निवडणूक निकालाच्या दिवशी पहिल्यांदाच सेन्सेक्स 3,000 अंकांनी घसरला. याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बाजारात एवढी मोठी घसरण झाली नव्हती.

Stock Market Crash
Bank Clinic: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता कोणतीही तक्रार एकाच पोर्टलवर करता येणार

गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे

या मोठ्या घसरणीचा परिणाम कंपन्यांच्या मूल्यावरही झाला. BSE वर असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल 401.51 लाख कोटी रुपयांवर आले आहे. कालच्या तेजीनंतर हा आकडा 423.21 लाख कोटी रुपयांवर पोहचला होता.

अशा प्रकारे आज शेअर बाजारातील कंपन्यांचे मूल्य 21 लाख कोटी रुपयांनी घसरले. म्हणजेच आजच्या विक्रीत बाजारातील गुंतवणूकदारांचे 21 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. निफ्टीमध्ये 10 वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाली आहे. निफ्टी 1,100 पेक्षा जास्त खाली आला आहे. INDIA VIX 40% वाढला आहे.

डॉलरच्या बाबतीत, BSE वर कंपन्यांचे मूल्य पुन्हा एकदा 5 ट्रिलियन रुपयांच्या खाली आले आहे. सुरुवातीच्या सत्राच्या ट्रेडिंगमध्ये, बीएसईवर कंपन्यांचा एकत्रित बाजार भांडवल डॉलरच्या दृष्टीने 4.95 ट्रिलियन पर्यंत खाली आले आहे.

Stock Market Crash
Gold Price Today: आज सोने पुन्हा झाले स्वस्त; लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात मोठी घसरण

कोणते शेअर्स घसरले?

शेअर बाजाराच्या कामकाजात प्रचंड घसरण असताना पीएसयू कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली जात आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स, इरकॉन इंटरनॅशनल आणि भेलचे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक घसरले.

टिटागढ रेल्वे, टॅक्समेको रेल्वे, कंटेनर कॉर्पोरेशन, इरकॉन इंटरनॅशनल, एचएएल आणि आयआरसीटीसी यांचे शेअर्सही मोठ्या घसरणीसह व्यवहार करत होते. गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेस 6.39 टक्क्यांनी घसरला तर एसीसी लिमिटेडचे ​​शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com