
भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून HCL Tech, Infosys, TCS सारख्या आयटी कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक कोसळले.
दोन दिवसांतच गुंतवणूकदारांचे तब्बल 9.76 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.
अमेरिकेचा टॅरिफ वाढीचा निर्णय, FII ची विक्री आणि ट्रेड डील न ठरणे ही घसरणीची प्रमुख कारणे आहेत.
Stock Market Closing Today: आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बँक निफ्टी 3 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. निफ्टी 200 अंकांनी घसरून 24,500च्या जवळ बंद झाला. सेन्सेक्स जवळजवळ 700 अंकांनी घसरून 80,100च्या जवळ बंद झाला.