
शेअर बाजारात आज सौम्य सुरुवात झाली, पण RBI च्या धोरण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध आहेत.
ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्यामुळे IT, फार्मा, ऑटो शेअर्सवर दबाव आला आहे.
दुसरीकडे, डिफेन्स, मेटल आणि मीडिया शेअर्समध्ये तेजी असून, सोनं-चांदीने नवे उच्चांक गाठले आहेत.
Stock Market Opening Today: आजच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजाराने सौम्य घसरणीसह सुरुवात केली. BSE सेन्सेक्स 16 अंकांनी घसरून 80,694 वर उघडला, तर NSE निफ्टी 8 अंकांनी घसरून 24,641 वर उघडला. बँक निफ्टीनेही 31 अंकांची घसरणीसह सुरुवात केली. रुपयाने डॉलरच्या तुलनेत 87.78 वर व्यवहार सुरू केला.