
Stock Market Opening Today: देशांतर्गत शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण झाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार घसरणीसह उघडला. ट्रम्प यांनी फार्मा क्षेत्रावर 100% कर लादण्याच्या घोषणेनंतर, फार्मा क्षेत्रात मोठी विक्री झाली. निर्देशांक 2.2% खाली आला. निफ्टी 80 अंकांनी घसरून 24,800च्या आसपास व्यवहार करत आहे. सेन्सेक्स देखील 320 अंकांनी घसरून 83,809च्या आसपास आहे.