
पीएम मोदींच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित मोठ्या घोषणांमुळे आज शेअर बाजारात जोरदार तेजी दिसली.
सेंसेक्स 718 अंकांनी वाढून 81,315 वर, तर निफ्टी 307 अंकांनी वाढून 24,938 वर उघडला.
ऑटो, फार्मा, मेटल, आयटी आणि रिअल्टी सेक्टरमध्ये मोठी वाढ; मारुती आणि बजाज फायनान्स टॉप गेनर्स.
Stock Market Opening Today: स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या मोठ्या घोषणांचा थेट परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. सकाळच्या सत्रातच बाजाराने जोरदार उसळी घेतली. सेंसेक्स 718 अंकांच्या वाढीसह 81,315 वर उघडला, तर निफ्टी 307 अंकांनी वाढून 24,938 वर पोहोचला. मात्र, बँक निफ्टीत 599 अंकांची घसरण होऊन तो 55,940 वर सुरू झाला.