
भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या सकारात्मक बातमीमुळे आज भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली.
सेन्सेक्स जवळपास 595 अंकांनी वाढून 82,380 वर बंद झाला, तर निफ्टीनेही 25,239 ची पातळी गाठली.
ऑटो, रिअल्टी आणि बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.
Stock Market Closing Today: आशियाई बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजार आज म्हणजेच मंगळवारी (16 सप्टेंबर) थोड्याशा वाढीसह उघडला. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.
तसेच, महिंद्रा अँड महिंद्रा आणि रिअॅलिटी शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे बाजार तेजीत होता. बीएसई सेन्सेक्स तब्बल 594.95 अंकांनी वाढून 82,380.69 या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 50 ही 169.90 अंकांनी वाढून 25,239.10 वर बंद झाला.