
Stock Market Closing Today: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर बुधवारी (7 मे) देशांतर्गत शेअर बाजार पुन्हा ग्रीन झोनमध्ये परतले आणि तेजीसह बंद झाले. भारतीय सैन्याने बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि त्यांच्या ताब्यातील पीओकेमधील दहशतवादी संघटनांच्या तळांवर मोठी कारवाई केली. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.