
शेअर बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली, सेन्सेक्समधील बहुतांश शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले.
मारुती सुजुकी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि महिंद्रा अँड महिंद्रासारख्या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली.
दरम्यान, जीएसटी सुधारणेचा प्रस्ताव चर्चेत असून 12% व 28% स्लॅब हटवून 40% चा नवीन स्लॅब लागू होण्याची शक्यता आहे.
Stock Market Closing Today: शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. विशेषतः ऑटो सेक्टरने जोरदार कामगिरी करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. आजच्या व्यवहारात निफ्टी ऑटो निर्देशांक तब्बल 4 टक्क्यांनी वाढला, ज्यामुळे या क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला.