

Mahatma Jyotiba Phule On Stock Market: महात्मा ज्योतिबा फुले हे 19व्या शतकातील विचारवंत, समाजसुधारक, लेखक, अभ्यासक आणि संपादक होते. त्यांनी आपले आयुष्य महिला, वंचित आणि शोषित शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वाहून घेतले. त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या आयुष्यातील एक पैलू अनेकदा मागे पडतो तो म्हणजे ते एक यशस्वी उद्योगपतीही होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. फुले, फळे, भाजीपाला, गूळ अशा जीवनावश्यक वस्तू विकून त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू व्यवसायाचा विस्तार केला.