Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टीने केला नवा विक्रम; पण गुंतवणूकदारांचे 1.67 लाख कोटींचे नुकसान

Share Market Today: शेअर बाजाराने आज पुन्हा नवा विक्रम केला आहे. सेन्सेक्सने प्रथमच 74000 चा टप्पा पार केला. इंट्राडे मध्ये त्याने 74151 चा विक्रमी उच्चांक गाठला आणि शेवटी 74085 अंकांवर बंद झाला.
Share Market latest updates in marathi
Share Market latest updates in marathi Sakal

Share Market Closing Latest Update 6 March 2024: शेअर बाजाराने आज पुन्हा नवा विक्रम केला आहे. सेन्सेक्सने प्रथमच 74000 चा टप्पा पार केला. इंट्राडेमध्ये त्याने 74151 चा विक्रमी उच्चांक गाठला आणि शेवटी 74085 अंकांवर बंद झाला. निफ्टी इंट्राडे 22497 अंकांवर पोहोचला आणि शेवटी 22474 अंकांवर बंद झाला. (Stock market today Nifty 50, Sensex hit fresh all-time highs; mid, smallcaps fall)

खासगी बँक, वित्तीय सेवा आणि फार्मा निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली. कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, बजाज ऑटो हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत. अदानी एंटरप्रायझेस आणि अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स निफ्टीचे सर्वाधिक घसरले आहेत.

सेन्सेक्स-निफ्टीने केला नवा विक्रम
सेन्सेक्स-निफ्टीने केला नवा विक्रमSakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात बुधवारच्या व्यवहारात घसरण झाली तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये तेजी होती.

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारात शेवटच्या टप्प्यात चांगली वाढ झाली. बजाज ऑटो, कोटक बँक, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, एसबीआय लाइफ, सन फार्मा आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स टॉप गेनर्सच्या यादीत होते तर अदानी एंटरप्रायझेस, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, ओएनजीसी, मारुती सुझुकी, बीपीसीएल आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्स घसरले.

Share Market latest updates in marathi
Unemployment Rate: बेरोजगारी वाढली की कमी झाली? निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने जाहीर केली आकडेवारी
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

52 आठवड्यांच्या उच्चांकावर कोणते शेअर्स?

आजच्या व्यवहारात बजाज ऑटो, सन फार्मा, टाटा कंझ्युमर, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

तर आयआयएफएल फायनान्स, सुमितोमो केमिकल्स, एसबीआय कार्ड, ओरिएंट रिफ्रॅक्टरीज, केआरबीएल, झी एंटरटेनमेंट आणि अतुल लिमिटेडचे ​​शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. शेअर बाजारातील तेजीचे मुख्य कारण म्हणजे खासगी बँकांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ.

Share Market latest updates in marathi
Gold Rate Today: सोन्याची चकाकी वाढली; भावाने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

गुंतवणूकदारांचे 1.67 लाख कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजार नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला असला तरी आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 391.37 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे जे मागील सत्रात 393.04 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 1.67 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com