

Stock Market Closing Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. सेन्सेक्स 1,131 अंकांनी वाढून 75,301 वर बंद झाला. निफ्टी 325 अंकांनी वाढून 22,834 वर बंद झाला. तर निफ्टी बँक निर्देशांक 960 अंकांनी वाढून 49,314 वर बंद झाला. आज निफ्टी ऑटो, मेटल आणि रियल्टी क्षेत्रात सर्वाधिक खरेदी दिसून आली.