Stock Market Today: Sensex Jumps 300 Points, Nifty Opens Higher; Top Gainers in Focus
eSakal
Share Market
Stock Market Today : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्सला फायदा?
Sensex Nifty Today : आज सकाळी निफ्टी मिडकॅप निर्देशांकात 0.3% घसरण झाली असून स्मॉलकॅप निर्देशांकात 0.6% घट नोंदवली गेली. सेक्टोंरल निर्देशांकात ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल्स, FMCG, मीडिया, फार्मा आणि PSU बँक यांच्यात घसरण झाली तर दुसरीकडे मेटल आणि ऑइल अँड गॅस शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
Budget Impact On Indian Stock Market : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2026 च्या भाषणात फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) वाढवण्याची घोषणा केल्यानंतर रविवारी झालेल्या विशेष ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार सहा वर्षातील सर्वात मोठ्या एक दिवसीय घसरणीसह बंद झाला. मात्र आज नव्या आठवड्याची सुरुवात शेअर बाजाराने सकारात्मकता दाखवत सपाट पातळीवर केली.

