

Stock Market Closing Latest Update 20 December 2024: देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह आठवडा संपला. शुक्रवारी (20 डिसेंबर) सपाट सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली आणि सलग 5 व्या दिवशी बाजार एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. निफ्टी 364 अंकांनी घसरून 24,587 वर बंद झाला. सेन्सेक्स 1176 अंकांनी घसरून 78,041 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 816 अंकांनी घसरून 50,759 वर बंद झाला.