
Stock Market Closing Latest Update 16 December 2024: आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात दबाव होता त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली तर रिॲल्टी, फार्मा, पीएसयू बँक निर्देशांक वाढीसह बंद झाले. मेटल, आयटी, एनर्जी शेअर्समध्ये दबाव दिसून आला.
व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 384.55 अंकांच्या किंवा 0.47 टक्क्यांच्या घसरणीसह 81,748.57 वर बंद झाला. तर निफ्टी 100.05 अंकांच्या किंवा 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह 24,668.25 च्या पातळीवर बंद झाला.