
Stock Market Opening Today: भारतीय शेअर बाजाराने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (6 ऑक्टोबर 2025) सकारात्मक सुरुवात केली. निफ्टी 24,900 च्या वर ट्रेड करत होता, तर सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 81,300 च्या वर पोहोचला.
बँकिंग शेअर्समध्ये प्रचंड खरेदी झाल्याने बँक निफ्टी 200 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. सेन्सेक्स 67 अंकांनी वाढून 81,274 वर, निफ्टी 22 अंकांनी वाढून 24,916 वर आणि बँक निफ्टी 245 अंकांनी वाढून 55,834 वर उघडला.