
भारतीय शेअर बाजाराने 1 सप्टेंबर रोजी जोरदार वाढ घेतली आणि सेन्सेक्स 555 अंकांनी व निफ्टी 198 अंकांनी वाढला.
M&M, Tata Motors सारख्या ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली, तर मिडकॅप-स्मॉलकॅप स्टॉक्सही जोरात वाढले.
GDP वाढीचे दमदार आकडे, GST सुधारणांची अपेक्षा आणि जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
Stock Market Closing Today: सुरुवातीपासूनच स्थिर सुरुवात झाल्यानंतर, आज बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स 555 अंकांनी वाढून 80,364 वर बंद झाला. निफ्टी 198 अंकांनी वाढून 24,625 वर बंद झाला. बँक निफ्टी 346 अंकांनी वाढून 54,002 वर बंद झाला.
गेल्या सलग तीन दिवसांत जवळपास 2.25% घसरलेल्या भारतीय शेअर बाजाराने 1 सप्टेंबर रोजी जोरदार पुनरागमन केले. GDP वाढीची आकडेवारी आणि GST सुधारांच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परत आला.