
Stock Market Closing Today: जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये बुधवारी (30 एप्रिल) भारतीय शेअर बाजार लाल रंगात बंद झाले. बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स सारख्या हेवीवेट शेअर्समधील मोठ्या घसरणीमुळे बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये घसरण झाली. शेवटच्या 30 मिनिटांच्या व्यवहारात बाजारात विक्रीचे वर्चस्व होते. ऑटो शेअर्समध्ये खरेदी झाल्याने बाजाराला आधार मिळाला.