

Stock Market Closing Today: ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांवर टॅरिफ हल्ला केला आहे. बुधवारी रात्री त्यांनी भारतावर 26 टक्के आणि चीनवर 34 टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली. यानंतर आज शेअर बाजारांमध्ये घसरणीचा कल दिसून आला.
मात्र, बाजार दिवसाच्या निचांकीवरून सावरला. निफ्टी 82 अंकांनी घसरून 23,250 वर बंद झाला. सेन्सेक्स 322 अंकांनी घसरून 76,295 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 249 अंकांनी वाढून 51,597 वर बंद झाला.