
आज शेअर बाजारात बहुतांश शेअर्स घसरणीसह बंद झाले; मारुती सुजुकी, BEL, HCL टेक्नॉलॉजीज, पॉवर ग्रिड आणि NTPC मध्ये सर्वाधिक विक्री झाली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.67% आणि 0.71% ने खाली आले.
GST बदल, प्रॉफिट बुकिंग आणि FII ची सततची विक्री यामुळे बाजारावर दबाव होता.
Stock Market Closing Today: आज शेअर बाजारात जीएसटी निर्णयांचा परिणाम दिसून आला. बऱ्याच काळानंतर बाजाराने जोरदार सुरुवात केली. काही तासानंतर बाजार वरच्या पातळींवरून घसरला. बेंचमार्क निर्देशांक वाढीसह बंद झाले असले तरी, जीएसटी दर कपातीमुळे बाजारात दिसणारी वाढ कमी झाली.