
Stock Market Closing Today: परदेशी गुंतवणूकदारांच्या (FII) सततच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजारात 10 ऑक्टोबरला सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. बीएसई सेन्सेक्स 328.72 अंकांनी वाढून 82,500.82 वर बंद झाला, तर निफ्टी 103.55 अंकांनी वाढून 25,285.35 च्या पातळीवर स्थिरावला. गेल्या तीन दिवसांपासून FII सातत्याने भारतीय बाजारात खरेदी करत असून त्यामुळे बाजाराचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. याशिवाय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेनुसार राहिले.