
आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला, सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून 81,548.73 वर बंद झाला.
निफ्टीही 25,005 पातळीवर बंद झाला.
एनटीपीसी, पॉवर ग्रीड, अॅक्सिस बँक टॉप गेनर्स ठरले, तर इन्फोसिस व टायटनमध्ये घसरण झाली.
Stock Market Closing Today: आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली होती, त्यानंतर दिवसभर बाजार किंचित वाढीसह व्यवहार करत राहिला. परंतु काल निफ्टी 25,000 च्या खाली बंद झाला त्या तुलनेत, आज तो या पातळीच्या वर बंद झाला. सलग सातव्या दिवशी बाजार वाढीसह बंद झाला.
निफ्टी 32 अंकांनी वाढून 25,005 वर बंद झाला. सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून 81,548 वर आणि बँक निफ्टी 133 अंकांनी वाढून 54,669वर बंद झाला.