
Stock Market Opening Today: गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सेन्सेक्स 200 अंकांपेक्षा जास्त वाढून 81,987 वर व्यवहार करत होता. निफ्टी 60 अंकांनी वाढून 25,100च्या वर होता. मेटल, आयटी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. दरम्यान, एनबीएफसी, एफएमसीजी आणि कंज्यूमर ड्यूरेबल शेअर्स घसरले.