Investment Plan
Investment Plansakal

Investment Plan : जोखीम न बाळगता गुंतवणूक करायची आहे ? मग हे वाचा...

सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी (SIP) गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. तरीही अनेकांचा बाजारावर विश्वास नाही. पण पैसे तर गुंतवायचे आहेत पण धोका नको असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडीमध्ये गुंतवणूक करू शकता.

सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी (SIP) गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. तरीही अनेकांचा बाजारावर विश्वास नाही. पण पैसे तर गुंतवायचे आहेत पण धोका नको असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला एकरकमी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवूनही तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस आरडी 5 वर्षांसाठी आहे. यामध्ये 6.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे, ज्याची गणना तिमाही आधारावर केली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही चांगला फंड जमा करु शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दरमहा 7000 गुंतवल्यास, तुम्ही 5 वर्षात 5 लाख आणि 10 वर्षात 12 लाख जमा करु शकता.

Investment Plan
IPO Open : वार्या क्रिएशनच्या आयपीओमध्ये करा 25 एप्रिलपर्यंत गुंतवणूक, अधिक जाणून घेऊयात...

जर तुम्ही या योजनेत दरमहा 7000 गुंतवले तर तुम्ही 5 वर्षात पोस्ट ऑफिस आरडीमध्ये एकूण 4 लाख 20 हजार 000 रुपये गुंतवाल. यामध्ये तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज दिले जाईल. याचा अर्थ तुम्हाला 5 वर्षात 79,564 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशात तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याज जोडल्यास, तुमची मॅच्युरिटी रक्कम सुमारे 5 लाख होईल. जर ही आरडी आणखी 5 वर्ष वाढवली तर तुम्ही सुमारे 12 लाख जमा करु शकता. यात तुमची एकूण गुंतवणूक 8 लाख 40 हजार असेल. यावर तुम्हाला 3 लाख 55 हजार 982 रुपये 6.7 टक्के दराने व्याज म्हणून दिले जातील आणि मॅच्युरिटीवर 11,95,982 रुपये म्हणजेच अंदाजे 12 लाख दिले जातील.

  • - पोस्ट ऑफिस आरडी 100 रुपयांनी उघडता येते, ही अशी रक्कम आहे जी कोणीही सहज वाचवू शकते. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

  • - तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडीवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. अशा परिस्थितीत तुम्हाला 5 वर्षात व्याजाच्या स्वरूपात चांगला नफा मिळतो.

  • - पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेमध्ये एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यामध्ये सिंगल व्यतिरिक्त जास्तीत जास्त 3 व्यक्तींसाठी जॉइंट खाते उघडता येते. यात मुलाच्या नावाने खाते उघडण्याचीही सोय आहे.

  • - आरडी खात्याची मॅच्युरिटी 5 वर्ष आहे. पण, प्री-मॅच्युअर क्लोजर 3 वर्षांनी करता येते. त्यात नॉमिनेशनचीही सोय आहे. त्याच वेळी, मॅच्युरिटीनंतर, आरडी खाते पुढील 5 वर्ष चालू ठेवता येते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com