
भारतीय उत्पादनांवर लावण्यात येणारा 25% अमेरिकन टॅरिफ एक आठवड्याने पुढे ढकलण्यात आला आहे, ज्यामुळे बाजारात रिकव्हरी झाली.
सेन्सेक्स व निफ्टीमध्ये सुरुवातीला घसरण झाली, पण HUL, Nestle, Eicher Motors यांसारख्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. Sun Pharma, M&M, Cipla यामध्ये मोठी घसरण झाली.
JSW Energy आणि Eicher Motors यांनी दमदार निकाल सादर केले. कोल इंडियाचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले होते, पण मार्जिन कमी झाले.
Trump Tariffs Updates: भारतीय उत्पादनांवर आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून 25 टक्के अमेरिकन टॅरिफ लागणार होतं. त्यामुळे संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरणीचं वातावरण होतं. पण आज सकाळी मोठी बातमी आली – हे टॅरिफ एक आठवड्याने पुढे ढकलण्यात आलं आहे. ही घोषणा होताच बाजाराने जोरदार कमबॅक केलं आहे.