
Tata Capital IPO
Sakal
Tata Capital IPO: टाटा ग्रुपकडून गुंतवणूकदारांना या दिवाळीत मोठे गिफ्ट मिळणार आहे. समूहाची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) टाटा कॅपिटलचा आयपीओ (IPO) अखेर जाहीर झाला असून तो 6 ऑक्टोबर 2025 रोजी खुला होणार आहे.
कंपनीने 26 सप्टेंबर रोजी सेबी आणि शेअर बाजारांकडे आपला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. एक्सचेंजच्या माहितीनुसार, या आयपीओच्या प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 ठेवण्यात आली असून यात 21 कोटी नवीन शेअर्सचा इश्यू आणि 26.58 कोटी शेअर्सचा OFS (Offer for Sale) समाविष्ट आहे.