Banking Share
Banking Share sakal

Banking Share : 'या' 2 बँकिंग शेअर्समध्ये मिळेल 37% रिटर्न

कोणते आहेत हे शेअर्स जाणून घेऊयात.
Published on

Banking Share : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात अतिशय चढ-उतार पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स या वर्षात आतापर्यंत 3.69% घसरला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत त्यात 0.57 टक्क्यांनी घट झाली आहे. निफ्टीचीही तीच स्थिती आहे.

अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना बाजारातून पैसे मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. पण येत्या काही दिवसांत लार्ज-कॅप बँकिंग स्टॉक सध्याच्या पातळीपासून सुमारे 27 टक्के रिटर्न देईल असा विश्वास शेअर मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहेत. कोणते आहेत हे शेअर्स जाणून घेऊयात. (these two banking shares will get 37 percent return read story )

Banking Share
Penny Stocks : पेनी स्टॉक्सची कमाल, गाठले अप्पर सर्कीट

ऍक्सिस बैंक (Axis Bank)

खासगी क्षेत्रातील ऍक्सिस बँकेने अलीकडेच सिटी बँकेच्या रिटेल कंझ्युमर बिझनेसचे अधिग्रहण पूर्ण केले. ब्रोकरेज मोतीलाल ओसवालने ऍक्सिस बँकेच्या शेअर्ससाठी ही डील सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. या डीलमुळे ऍक्सिस बँकेला 24 लाख नवीन ग्राहक मिळतील असा अंदाज आहे.

मोतीलाल ओसवाल यांचा ऍक्सिस बँकेवर बाय रेटींग देत 1,130 रुपयांचे टारगेट दिले आहे. हे सध्याच्या बाजारभावापेक्षा 33.66 टक्क्यांनी जास्त आहे. ऍक्सिस बँकेचे शेअर्स सध्या 844 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

Banking Share
Bank Holidays : मार्च महिन्यात 'एवढ्या' दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

फेडरल बँक (Federal Bank)

ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीज फेडरल बँकेच्या शेअर्सबाबत सकारात्मक आहे. बँक अधिक मार्जिन प्रॉडक्ट्सवर फोकस करत आहे, ज्याचा फायदा आगामी काळात होईल.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या अहवालात फेडरल बँकेच्या शेअर्सवर 165 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटींग दिले आहे. हे सध्याच्या किंमतीपेक्षा 27.48 टक्क्यांनी जास्त आहे. फेडरल बँकेचे शेअर्स सध्या 133.25 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com