Investment Plan : सुरक्षित गुंतवणुक आणि परताव्यासाठी पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम येईल कामाला

भारतात आजही एक असा वर्ग आहे जो शेअर मार्केट किंवा एसआयपीपेक्षा पोस्ट ऑफीसवर जास्त विश्वास ठेवतो. कारण प्रत्येकालाच आपला मेहनतीने कमावलेला पैसे सुरक्षित राहावा असे वाटत असते, त्यावर मार्केटमधली अस्थिरता धोका यांचा चान्स घ्यायचा नसतो.
Investment Plan
Investment Plansakal

भारतात आजही एक असा वर्ग आहे जो शेअर मार्केट किंवा एसआयपीपेक्षा पोस्ट ऑफीसवर जास्त विश्वास ठेवतो. कारण प्रत्येकालाच आपला मेहनतीने कमावलेला पैसे सुरक्षित राहावा असे वाटत असते, त्यावर मार्केटमधली अस्थिरता धोका यांचा चान्स घ्यायचा नसतो. अशा सगळ्यांसाठी पोस्ट ऑफीसची एक स्कीम आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग्ज स्कीम. यात एकरकमी गुंतवणूक केल्यास तुम्हाला मंथली परतावा मिळतो शिवाय तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते.

  • गुंतवणूक - 9 लाख

  • वार्षिक व्याज दर - 7.4%

  • कालावधी - 5 वर्ष

  • व्याजातून कमाई - 3 लाख 33 हजार

  • मासिक उत्पन्न - 5 हजार 550 रुपये

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत, गुंतवणूकदार एकाच खात्यात 9 लाख आणि संयुक्त खात्यात अर्थात जॉईंट अकाउंटमध्ये 15 लाख जमा करू शकतात. तुमची इच्छा असल्यास, तुम्हाला मूळ रक्कम 5 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर परत केली जाईल. पण त्याच वेळी, ते आणखी 5-5 वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते. दर 5 वर्षांनी, मूळ रक्कम काढण्याचा किंवा योजनेला मुदतवाढ देण्याचा पर्याय असेल. खात्यावर मिळणारे व्याज दर महिन्याला पोस्ट ऑफिस बचत खात्यात भरले जाते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणुकीवर टीडीएस कापला जात नाही. मात्र, तुमच्या हातात येणारे व्याज करपात्र असते.

Investment Plan
ICICI Bank Share : आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 8 लाख कोटी पार ; हा टप्पा ओलांडणारी पाचवी भारतीय कंपनी

पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग्ज स्कीममध्ये मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याची गरज असल्यास, तुम्हाला ही सुविधा एका वर्षानंतर मिळते, पण त्यापूर्वी रक्कम काढायची असेल, तर ते शक्य नाही. प्री-मॅच्युअर क्लोजरच्या बाबतीतही तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्ही 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले, तर ठेव रकमेतील 2% कपात केली जाते आणि परत केली जाते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com