
आज शेअर बाजारात एकाच दिवशी 5 आयपीओ ओपन होणार आहेत, ज्यात 4 मेनबोर्ड आणि 1 एसएमई सेगमेंट आहे.
विक्रम सोलर हा सर्वांत मोठा आयपीओ असून ₹2079 कोटी उभारणार आहे.
ग्रे मार्केटमध्ये विक्रम सोलर आणि पटेल रिटेल आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
IPO Update Today: आज शेअर बाजारात एकाच दिवशी तब्बल पाच कंपन्यांचे आयपीओ उघडणार आहेत. यामध्ये चार मेनबोर्ड आयपीओ असून एक आयपीओ एसएमई सेगमेंटमधला आहे. हे सर्व आयपीओ 21 ऑगस्टपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुले राहणार आहेत.