
Stock Market Closing Today: आज (12 जून) देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली, परंतु नंतर शेवटच्या काही तासांत बाजार कोसळला. सेन्सेक्स 900 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. त्याच वेळी, निफ्टी देखील 250 अंकांनी घसरला आणि 24,900च्या खाली आला. शेवटी सेन्सेक्स 823 अंकांनी घसरून 81,691 वर बंद झाला.
निफ्टी सुमारे 253 अंकांनी घसरून 24,888 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 377 अंकांनी घसरून 56,082 वर बंद झाला. शेअर बाजारातील आजच्या घसरणीमागे अनेक महत्त्वाची कारणे होती.