Banking Crisis: दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांचे बँकिंग संकटावर सूचक वक्तव्य; म्हणाले, गुंतवणूकदारांचे पैसे...

जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी सुरू झालेल्या बँकिंग संकटावर भाष्य केले आहे
Warren Buffett on Bank Crisis
Warren Buffett on Bank CrisisSakal

Warren Buffett on Bank Crisis: जगातील आघाडीचे गुंतवणूकदार आणि अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या वॉरेन बफे यांनी अमेरिकेत सुरू झालेल्या बँकिंग संकटावर भाष्य केले आहे.

बँकिंग संकटाबाबत ते म्हणाले की, बँक बुडण्याची ही पहिलीच वेळ नाही. भविष्यात अशी आणखी बँकिंग संकटे येऊ शकतात, परंतु यासाठी बहुतेक लोकांना काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांचे पैसे फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे सुरक्षित आहेत.

बँकिंग संकट संपलेले नाही :

वॉरेन बफे म्हणाले की, बँकिंग संकटाचा हा टप्पा अद्याप संपलेला नाही, परंतु यासाठी बहुतांश ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. (Warren Buffett says bank crisis not over yet explains what's happening to depositors' money)

बँक कोसळू शकते, परंतु बहुतेक गुंतवणूकदारांचे पैसे अमेरिकेच्या फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे सुरक्षित आहेत आणि त्यांना हे पैसे गरजेच्या वेळी मिळतात.

अमेरिकेच्या FDIC च्या नियमांनुसार, देशातील कोणतीही बँक बुडली तर ग्राहकांना 2.5 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 कोटी रुपयांचा दावा मिळू शकतो. यावरील रकमेवर सरकारच्या हस्तक्षेपानंतरच दावा करता येईल.

विशेष म्हणजे अमेरिकेतील दोन मोठ्या बँका सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक दिवाळखोरीत निघाल्या होत्या. या बँका बुडल्यानंतर लोकांना 2008 ची आर्थिक मंदी आठवली. बँका बुडल्यानंतर त्याचा परिणाम जगभरातील बँकांवर दिसून आला.

Warren Buffett on Bank Crisis
Reserve Bank Of India: RBI चा कर्जदारांना मोठा दिलासा, कर्ज चुकवले तर आता होणार...

वॉरन बफे यांनी त्यांच्या उत्तराधिकारीची घोषणा केली

कंपनीवर आपला विश्वास व्यक्त करताना वॉरेन बफे म्हणाले की, सीईओ पद सोडल्यानंतरही कंपनीची प्रगती वेगाने होत राहील.

कंपनीचे व्हाईस चेअरमन ग्रेग एबेल यांना त्यांनी उत्तराधिकारी बनवले आहे. ते म्हणाले की ग्रेग एबेल कंपनीला प्रगतीच्या मार्गावर नेतील आणि त्यांच्या कार्याचा आदर्श पुढे नेतील.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आयएमएफचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनीही इशारा दिला आहे की बँकिंग क्षेत्रातील संकट आगामी काळात अधिक गडद होऊ शकते.

ते म्हणाले की सिलिकॉन व्हॅली बँक आणि क्रेडिट सुईस बँकेची प्रकरणे पाहता, जागतिक बँकिंग प्रणालीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. अशा परिस्थितीत जगातील बँकिंग व्यवस्था एका मोठ्या धोक्याकडे वाटचाल करत आहे. 

Warren Buffett on Bank Crisis
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com