

Why Stock Market Crash Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 1100 अंकांच्या घसरणीनंतर 80230 च्या पातळीवर व्यवहार करत आहे, तर निफ्टी देखील 300 हून अधिक अंकांनी घसरत आहे. बँकिंग, आयटी आणि पॉवर शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली आहे. बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.