Zomato Shares: ब्रोकरेजच्या रेटींगनंतर झोमॅटोच्या शेअर्समध्ये घसरणीसह विक्रीचा दबाव; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Zomato Shares: ऑनलाइन फूड आणि ग्रॉसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्सवर सध्या प्रचंड विक्रीचा दबाव आहे. शुक्रवारी दिवसभरात तो 5 टक्क्यांहून अधिक घसरला. किमतीत रिकव्हरी झाली आहे पण ती अजूनही खूपच कमकुवत स्थितीत आहे.
Zomato share price
Zomato share price Sakal

Zomato Shares: ऑनलाइन फूड आणि ग्रॉसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्सवर सध्या प्रचंड विक्रीचा दबाव आहे. शुक्रवारी दिवसभरात तो 5 टक्क्यांहून अधिक घसरला. किमतीत रिकव्हरी झाली आहे पण ती अजूनही खूपच कमकुवत स्थितीत आहे. कंपनीच्या शेअर्सवर हा विक्रीचा दबाव ब्रोकरेजच्या ट्रेंडमुळे आहे.

ज्याने क्विक कॉमर्स स्पेसमध्ये वाढत्या स्पर्धेमुळे 12 महिन्यात 47 टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज लावला आहे. सध्या बीएसईवर 3.93 टक्क्यांच्या घसरणीसह त्याची किंमत 173.45 रुपये आहे. इंट्रा-डेमध्ये तो 5.15 टक्क्यांनी घसरला आणि 171.25 रुपयांपर्यंत आला आहे.

ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने झोमॅटोचे अंडरपरफॉर्म रेटिंग कायम ठेवले आहे आणि 96 रुपयांचे टारगेट दिले आहे, जे गुरुवारच्या 180.55 रुपयांच्या बंद किंमतीपासून सुमारे 47 टक्के कमी आहे. ब्रोकरेजने गेल्या वर्षी मे पासून त्याचे रेटिंग न्यूट्रल वरून अंडरपरफॉर्मवर कमी केल्यावर त्याला अंडरपरफॉर्म रेटिंग दिले आहे.

मॅक्वेरी हे तीन विश्लेषकांपैकी एक आहेत ज्यांनी झोमॅटोला एक तर सेल किंवा त्यासारखे रेटिंग दिले आहे. जिओमार्टही पुढच्या महिन्यापासून अर्ध्या तासात ग्रॉसरीची डिलिव्हरी सुरू करणार असल्याने स्पर्धा झपाट्याने वाढत असल्याचे मॅक्वेरी सांगतात. जिओमार्टच्या देशातील 20-30 शहरांमध्ये सुरू होतील.

Zomato share price
Gold Price 2024: सोन्यात गुंतवणूक करणारे या वर्षी होऊ शकतात मालामाल; काय आहे कारण?

मार्च तिमाहीत ब्लिंकिट EBIT पॉझिटिव्ह होता, तर महसूल वर्षानुवर्षे दुपटीने वाढून 769 कोटी झाला. झोमॅटोने मार्च तिमाहीत 175 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला होता, जो एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 188 कोटींचा निव्वळ तोटा झाला होता.

गेल्या वर्षी 1 जून 2023 रोजी ते 67.61 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. यानंतर, 11 महिन्यांत ते जवळपास 207 टक्क्यांनी वाढले आणि 13 मे 2024 रोजी 207.30 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. पण शेअर्सची ही तेजी थांबली आणि सध्या ती या उच्चांकावरून 16 टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

Zomato share price
Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com