

Audi SQ9 India Launch
esakal
उष्णतेच्या तडाख्यातही ‘थंडावा’ देणाऱ्या नव्या रूपातील वाहनांची बाजारात एंट्री सुरू आहे. भारतीय ऑटो बाजारात आलिशान ते किफायतशीर अशा विविध पर्यायांचे दालन कंपन्यांनी ग्राहकांसाठी खुले केले आहे. ‘ऑडी’ची परफॉर्मन्स-केंद्रित एसयूव्ही दमदार अनुभव देते, किया सोनेट अपडेटेड फीचर्ससह अधिक सोयीस्कर ठरते, तर दैनंदिन वापरासाठी हीरो डेस्टिनी ११० स्कूटर व्यवहार्य पर्याय म्हणून पुढे येते. त्यामुळे या तिन्ही वाहनांतून उष्ण बाजारपेठेतही परफॉर्मन्स, आराम आणि उपयोगिता यांचा ‘कूल’ समतोल अनुभवायला मिळतो.
जर्मन लक्झरी मोटार निर्माता ‘ऑडी’ने भारतीय बाजारात नुकतीच दमदार परफॉर्मन्स देणारी एसयूव्ही ‘ऑडी एसक्यू-९’ दाखल केली. आकर्षक डिझाइन, प्रचंड शक्तिशाली इंजिन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेली ही एसयूव्ही केवळ लक्झरीच नाही, तर स्पोर्टी ड्रायव्हिंगचा रोमांचक अनुभव देण्याची हमी देणारी आहे. उच्च दर्जाच्या परफॉर्मन्ससोबतच प्रीमियम कम्फर्ट आणि आधुनिक फीचर्समुळे ही एसयूव्हीप्रेमींसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.