

Gold price crash analysis
esakal
अमेरिका-इराण युद्धामुळे सोन्याच्या भावात झालेली घसरण हा केवळ एक तात्पुरता थांबा असून, अंतिम उद्दिष्ट अजून गाठायचे आहे. मागील दोन वर्षांत विक्रमी परतावा दिल्यानंतर २०२६ मध्ये सोन्याच्या भावात झालेली घसरण गुंतवणूकदारांसाठी संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे. मात्र, ही घसरण तात्पुरती आहे, की दीर्घकालीन बदलाची नांदी, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो आहे. याचे उत्तर मिळविण्याचा हा प्रयत्न...
पुन्हा ‘सोन्याचे’ दिवस येतील का? हा प्रश्न सध्या जनमानसात चर्चेचा विषय ठरत आहे. मागील दोन वर्षांत भरघोस परतावा दिल्यानंतर जानेवारी २०२६ पासून सोन्याच्या भावात सुमारे २५ टक्के घसरण दिसून आली. त्यानंतर मागील चार महिन्यांपासून सोने खरेदीबाबतची उत्सुकता कमी होताना दिसत आहे. या कालावधीत अमेरिका-इराणमधील युद्ध तीव्र झाले, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आणि घरगुती गॅसच्या दरातही महागाई जाणवू लागली. अशा परिस्थितीत पुढील काळात सोन्याच्या भावाची दिशा काय असेल? सोने पुन्हा नवा उच्चांक गाठेल का, की काही काळ स्थिर राहील? हे आपण समजून घेऊ या.