

UPI Payment
esakal
मोदी सरकारकडून युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय सिस्टिमच्या वापरावर व्यापाऱ्यांकडून शुल्क वसूल करण्याची तयारी केलीय. मंगळवारी संसदेत आर्थिक व्यवहारांसदर्भात कायद्यात प्रस्ताविद बदल सादर केले गेले. यामुळे युपीआय व्यवहारावर शुल्क आकारलं जाण्याची शक्यता वाढली आहे. मात्र हे शुल्क केवळ व्यापाऱ्यांना लागू होणार आहे. ग्राहकांसाठी हे लागू नसले तरी या बदलाचा परिणाम डिजिटल पेमेंटवर होऊ शकतो.