

Warren Buffett Index
sakal
बी. एम. रोकडे- निवृत्त बँक अधिकारी
भारतीय शेअर बाजाराने गेल्या एका वर्षात विक्रमी तेजी अनुभवली असून, ‘सेन्सेक्स’ने जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या एका वर्षात १० हजार अंशांची झेप घेतली आहे. एकीकडे देशाची अर्थव्यवस्था मजबूत वाढ दर्शवत असताना, दुसरीकडे बाजाराचे मूल्यांकन योग्य आहे की अति-महाग झाले आहे, हा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावत आहे. अशा परिस्थितीत ‘वॉरेन बफेट निर्देशांक’ हा भारतीय शेअर बाजाराची खरी दिशा आणि जोखीम समजून घेण्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो.
शेअर बाजारातील गुंतवणुकीतील अस्थिरता मोजण्यासाठी ‘भारत व्हीआयएक्स निर्देशांक’ (India VIX – Volatility Index) वापरला जातो. हा निर्देशांक भारतीय शेअर बाजारातील पुढील ३० दिवसांतील अपेक्षित अस्थिरता दर्शवतो. तो ‘निफ्टी ५०’च्या ऑप्शन किंमतींवर आधारित असतो. शेअरच्या अपेक्षित भावाचा अंदाज घेण्यासाठी, जोखीम ओळखण्यासाठी; तसेच ट्रेडिंग धोरणे आखण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे.