
अमेरिकन शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली. टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४ ते ११ टक्क्यांची घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचं अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. वॉल स्ट्रीटवरील प्रमुख शेअर बाजार निर्देशांकात घसरण सुरूच आहे. एस अँड पी २.२ टक्के, डाउ जोन्स ५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरलेत. तर नॅस्डॅक ३.६ टक्क्यांनी घसरलाय. गेल्या काही आठवड्यांमधील ही सर्वात मोठी घसरण ठरलीय.