भारताच्या आर्थिक इतिहासाचा अव्वल स्रोत

स्वातंत्र्योत्तर भारताच्या पहिल्या तीन दशकी आर्थिक वाटचालीचे रेखाटन करणाऱ्या या प्रस्तुत दस्तऐवजाची गणना तशा मोजक्या ग्रंथांमध्ये करावी लागेल
Abhay Tilak writes source for India economic history A K Bhattacharya
Abhay Tilak writes source for India economic history A K Bhattacharyasakal
Summary

स्वातंत्र्योत्तर भारताच्या पहिल्या तीन दशकी आर्थिक वाटचालीचे रेखाटन करणाऱ्या या प्रस्तुत दस्तऐवजाची गणना तशा मोजक्या ग्रंथांमध्ये करावी लागेल

- अभय टिळक

स्म रणरंजनाबरोबरच इतिहासाचे वाचन व्यक्तीला स्मृतिकातरही बनवते. परंतु, इतिहासलेखनाचे प्रयोजन तेवढ्यापुरतेच सीमित नाही आणि नसतेही. इतिहासाच्या पार्श्वपटावर उमललेल्या वर्तमानाचे आपले वाचन आणि आकलन अधिक सम्यक् बनविणारी प्रगल्भ अशी इतिहासदृष्टी प्रदान करणे, हे इतिहासग्रंथांचे वास्तवातील प्रयोजन होय.

अशी सघन इतिहासदृष्टी विकसित करण्यास हातभार लावणारे इतिहासलेखनही मोजकेच हाती येते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या पहिल्या तीन दशकी आर्थिक वाटचालीचे रेखाटन करणाऱ्या या प्रस्तुत दस्तऐवजाची गणना तशा मोजक्या ग्रंथांमध्ये करावी लागेल.

अर्थपत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अशी कारकीर्द गाठीशी असलेल्या ए. के. भट्टाचार्य यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराने हा ग्रंथ अक्षरबद्ध केला आहे. त्यामुळेच १९४७ ते १९७७ या तीन दशकांदरम्यानच्या भारतीय अर्थकारणाचा हा इतिहास संदर्भविविधता आणि वाचनीयता अशा उभय वैशिष्ट्यांनी समृद्ध बनलेला आहे.

Abhay Tilak writes source for India economic history A K Bhattacharya
Mumbai Crime News : वसतीगृह हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट; आता वॉर्डनची चौकशी...

स्वतंत्र भारताचे पहिलेवहिले अर्थमंत्री म्हणून कार्यभार पेलणाऱ्या आर.के.षण्मुगम चेट्टी यांच्यापासून ते १९७४ मध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्त झालेल्या सी. सुब्रमण्यम् यांच्यापर्यंतची कारकीर्द या ग्रंथात लेखकाने तपशीलवार चितारलेली आहे.

१९४७ ते १९७७ या तीन दशकांच्या कालावधीदरम्यान ११ अर्थमंत्री देशाने बघितले. त्यांपैकी टी. टी. कृष्णम्माचारी आणि मोरारजी देसाई हे दोघे दोन निरनिराळ्या कालखंडांत अर्थमंत्री म्हणून दोन वेळा नियुक्त झाले. त्यांमुळे, वास्तवात एकंदर नऊ अर्थमंत्र्यांची कारकीर्द स्वतंत्र भारताने अनुभवली.

Abhay Tilak writes source for India economic history A K Bhattacharya
World Economic Forum : पुढच्या पाच वर्षांत भारतातल्या नोकऱ्यांमध्ये २२ टक्के वाढ; सर्वेक्षणातून आलं समोर

कोणत्याही देशाचे अर्थमंत्रिपद हे व्यवहारात राजकीयदृष्ट्या कमालीचे संवेदनशील व कळीचे शाबीत होते. साहजिकच, देशाच्या अर्थकारणाचे सुकाणू जिच्या हातात सुपूर्त करावयाचे ती व्यक्ती पंतप्रधानांच्या विश्वासातील असते अथवा असावी हे ओघानेच येते.

त्यांमुळे, खातेवाटपादरम्यान अर्थमंत्रिपदासाठी उमेदवार निश्चित होतेवेळी पक्षांतर्गत राजकीय प्रवाह-उपप्रवाह गतिमान बनावेत हे स्वाभाविकच. अर्थखाते सांभाळण्यासंदर्भातील संबंधित नेतृत्वाची क्षमता हाच केवळ एकमात्र निकष मग तिथे उपयोगी ठरत नाही.

मंत्रिमंडळाच्या प्रमुखाशी असलेले त्या व्यक्तीचे वैचारिक नाते, पंतप्रधानांप्रती तिची असलेली निष्ठा आणि मुख्य म्हणजे अर्थविषयक धोरणांसंदर्भात पंतप्रधान व पक्ष या दोघांच्या भूमिकांशी तिची नाळ कितपत जुळलेली आहे या बाबी त्या बिंदूवर केंद्रवर्ती महत्त्वाच्या ठरतात.

त्या दृष्टीने, पंडित जवाहरलाल नेहरू , लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी या तीन पंतप्रधानांनी निवडलेले अर्थमंत्री, त्या निवडीदरम्यान निर्णायक ठरलेल्या राजकीय घडामोडी, अर्थमंत्रीपदावर काम करत असताना त्या त्या काळातील पंतप्रधानांबरोबर गुंतलेले त्या त्या अर्थमंत्र्यांचे वादी-संवादी सूर यांचा लेखकाने शब्दांकित केलेला आलेख विलक्षण वेधक, तरल आणि तितकाच विश्लेषक आहे.

केंद्र सरकारातील अर्थमंत्रालय व अर्थमंत्री आणि भारतीय रिझर्व्ह बँक व रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्यादरम्यानचा विसंवाद हे आपल्या देशातील अलीकडील आर्थिक वास्तवाचे एक विवाद्य पर्व ठरत आलेले आहे.

अर्थमंत्रालयाची कार्यपद्धती रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा संकोच घडवून आणणारी अशी आहे, असे आक्षेपवजा शल्य डी. सुब्बराव यांच्यापासून ते रघुराम राजन यांच्यापर्यंतचे गव्हर्नर व्यक्त करत आलेले आहेत.

त्यांतूनच, अर्थमंत्रालयाशी सूर जुळत नसल्याने एकतर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरील व्यक्तीने राजीनामा देणे अथवा संदर्भीत व्यक्तीला मुदतवाढ नाकारली जाणे यांसारखे प्रसंग निकटच्या भूतकाळात आपण बघितले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा हा मुद्दा आजकालचा नसून थेट पंडित नेहरू व त्यांचे विश्वासपात्र असणाऱ्या टी. टी. कृष्णम्माचारी यांच्या काळापासून गाजत असल्याची साक्ष हा ग्रंथ पुरवतो.

स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासाचे एक अव्वल साधन म्हणून तर या ग्रंथाला एक आगळेच संदर्भमूल्य लाभलेले आहे. देशासमोरील गुंतागुंतीच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय आव्हानांच्या चौकटीत त्या त्या काळातील अर्थमंत्र्यांनी उचललेली धोरणात्मक पावले, घेतलेले निर्णय यांचा ए. के. भट्टाचार्य यांनी मांडलेला विश्लेषक आढावा वर्तमानातील आर्थिक वास्तवाचे आपले आकलन अधिक तारतम्यपूर्ण बनण्यास उपकारक ठरणारा असाच आहे.

अर्थमंत्रिपदावरील नेतृत्वाने अर्थसंकल्प सादर करतेवेळी केलेली भाषणे, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची आत्मचरित्रे व आठवणी, तत्कालीन राजकीय तसेच सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांचा पत्रव्यवहार, भारतीय रिझर्व्ह बँकेचा इतिहास यांसारख्या विविध संदर्भस्त्रोतांद्वारे गोळा केलेल्या आधारसाहित्यावर लेखकाने त्याचे विश्लेषण बेतलेले असल्यामुळे ते केवळ औरसचौरसच नव्हे तर सखोल-सघनही बनलेले आहे.

पुस्तक ः इंडियाज् फायनान्स मिनिस्टर्स :

फ्रॉम इन्डिपेन्डन्स टू इमर्जन्सी (१९४७-१९७७),

लेखक : ए. के. भट्टाचार्य, पेन्ग्विन रॅन्डम हाऊस,

गुरूग्राम, हरियाना, २०२३,

पृष्ठे : ४४५, मूल्य : रुपये ९९९/-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com