मारण मंत्राचा प्रभाव! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

भारतीय राजकारणात तग धरायचा असेल, तर काही सिद्ध मंत्रांची उपासना करणे नितांत गरजेचे आहे. (राजकारणात) तग धरणे, टिकाव लागणे, उत्कर्ष साधणे, कुरघोडी करणे, अशा आदी कृत्यांसाठी मंत्रशक्‍तीचा सपोर्ट लागतो. त्यासाठी उपासना करावी लागते किंवा सुप्रसिद्ध सिद्धसाधक बाबा बंगाली ह्यांच्याकडे व्हिजिट द्यावी लागते. बाबा बंगाली ह्यांना कोण ओळखत नाही? गुप्तधन, व्यवसाय में खोट, प्रेमसंबंध में बाधा, वशीकरण आदी कामे ते (वाजीब दरात) करून देतात. (तुरंत मिलें : गाला नं. 3, रेड रोज होटल के सामने...) आम्ही बाबा बंगाली ह्यांचे परमशिष्य आहो. जय बाबा बंगाली!!

परवा वजनदार एक पुढारी दबकत दबकत बाबा बंगाली ह्यांच्या आश्रमात आले. त्यांचे नाव आम्ही सांगणार नाही. आमच्या क्‍लायंटची गोपनीयता आम्ही फार पाळतो. दरवाजात त्यांनी आम्हाला गाठले. त्यांचाही इलाज नव्हता, आम्ही दारावर आडवा पाय घालूनच बसलो होतो.

''क्‍या काम हय?'' आम्ही विचारले.

''जे श्री क्रष्ण...बाबाजी कू मिलने कू होना,'' सदर इसमाने डोक्‍याभोवतीचा मफलर न काढता उत्तर दिले. नखशिखांत लपेटलेला सदर मनुष्य चिनी लसूणगड्ड्यासारखा दिसत असला, तरी तो नामचीन पुढारी आहे हे आम्ही तुरंत वळखले. आमच्याकडे पुढारी मंडळी सर्वसाधारणपणे ह्याच वेषात येतात. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पास झाल्यानंतर हल्ली त्यांची वर्दळ वाढली आहे, ही नोंद घेण्याजोगी बाब.

''बाबाजी बिझ्जी है, कल आना...,'' आम्ही ठरलेले सरकारी उत्तर दिले. त्याने लागलीच आमच्याशी पन्नास रुपयाच्या नोटेचे हस्तांदोलन केले. आम्ही त्यास आतील दालनात घेऊन गेलो. दालनात अंधार होता व बकऱ्याच्या वासासारखा कुबट वास येते होता. सदर वास बकऱ्याचा नसून गेले कैक वर्षे अंघोळ न केलेल्या बाबाजींचा होता, हे वेगळे काय सांगावयाचे?

...बारा अगरबत्त्यांचा जुडगा धरून बाबाजी लायटरने पेटवीत होते. गेले सव्वाशे वर्षे बाबाजी हाच लायटर वापरत असून, त्यातला ग्यास कधीही संपत नाही, अशी माहिती आम्ही तांतडीने गिऱ्हाइकास पुरविली. बाबाजींकडे तो आदराने पाहू लागला. म्हंजे पाहत असावा! डोक्‍याभोवतीच्या मफलरात काय दिसणार?

''क्‍या अडचन ऱ्हीं?'' बाबाजींनी विचारले.

''एक आदमी की पावर कम करनी है!'' गिऱ्हाइक म्हणाले.

''होगी!!..वो खुद पार्टी छोड देगा ऱ्हां!'' बाबाजींनी डोळे मिटून सांगितले.

''हम राणेदादा की बात नै करता ऱ्हुं! अलग पार्टी का पुढारी हय! उसकी पावर कम होएंगी ऐसा कुछ मंत्र देना!!'' गिऱ्हाइकाने खुलासा केला. एखाद्या पुढाऱ्याची पावर निम्म्यावर आणायची असेल तर बाबाजींकडे एकसोएक जबर्दस्त मंत्र आहेत.
''तुमकू हम एक ऐसा मंत्र देता हय... काम हो जायेगा!! मागे एका मिनिष्टरने हाच मंत्र म्हटला तर त्याची पोझिशन इम्मिजिएट डाऊन झाली!!'' बाबांजींनी डोळे फिरवत सांगितले. गिऱ्हाइकाला उत्साह आला.

''कुठला मंत्र बाबाजी?'' गिऱ्हाइकाने अधीरतेने विचारले.

''केटुएचटु मंत्र!'' बाबाजी म्हणाले, ''हा मंत्र जो पुढारी उच्चारतो, त्याची पॉवर अर्जंटमधे कमी होते! घ्या लिहून...बडे बडे शहरों में, छोटे छोटे हादसे होते रहते है...''
''मारी गयो रे बाप..,'' असे ओरडत सदर मफलरधारी वजनदार पुढारी जीव खाऊन पळत का सुटला, हे मात्र आम्हाला कळले नाही. असो.

Web Title: Dhing Tang