सच्चाई! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 11 मे 2017

अरे, आपला बॉस गावात नसला की कार्यकर्त्यांना बरंच वाटत असतं! तू लक्ष देऊ नकोस! त्यांना मोकळीक मिळावी, म्हणून हल्ली मीसुद्धा फारसं लक्ष घालत नाही! बघतोयस नं तू?

बेटा : (नेहमीपेक्षा उत्साही एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण..! मम्मा, आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रे वाचण्यात दंग...) हं!
बेटा : (किंचित हिरमुसून) आर यू नॉट हॅपी? क्‍या आप खूश नहीं है? इतक्‍या दिवसांनी मी आलो! आंघोळ, नाश्‍ता सगळं आटोपून आलो, तरीही तुला आनंद झालेला दिसत नाही, मम्मा!!
मम्मामॅडम : (संयमानं) झालाय रे!
बेटा : (निक्षून) उंहुं!! नाहीच मुळी झालेला!! जब जब मैं यहां आया, तब तब मेरी दुलार होती थी. आजकल पार्टी में भी मेरी दुलार कम होती नजर आ रही है!! मागल्या वेळी आलो होतो तेव्हा, दरवाज्यात अहमद अंकल छान हसायचे! पण आत्ता मला बघून "आलोच' असं सांगून घाईघाईने पळून गेले!!
मम्मामॅडम : (हसून खुलासा करत) अरे, ते ना? त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस! ते तुला बघून पळून नाही काही गेले!! तुझ्यापाठोपाठ महाराष्ट्रातले नारोबादादा राणे येताना बघून ते पळाले असतील!! राणेदादांना हल्ली जाम घाबरतात तुझे अहमद अंकल!! हुहुहु!!
बेटा : (अविश्‍वासानं) वेल, आय डोंट थिंक सो! पार्टी ऑफिसमध्येही एकेकाळी मी आलो की लोक उठून उभे राहायचे!!
मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालत) मग आता उठून उभे राहात नाहीत की काय?
बेटा : (शांतपणे) आता उठून चालायला लागतात!
मम्मामॅडम : (दुखावून) ओह! तू दु:खी होऊ नकोस बेटा!! गेल्या इलेक्‍शननंतर असंच होतंय, हे पाहतेय मी! पण एकदा तुला राज्याभिषेक झाला की सगळं बदलेल हं!! डोण्ट वरी!!
बेटा : (निरागसपणाने) मम्मा, कधी करणार मला राज्याभिषेक?
मम्मामॅडम : (समजूत घालत) लौकरच! अब दिल्ली दूर नहीं!!
बेटा : (दुप्पट निरागसपणाने) पण आपण आत्ता दिल्लीतच आहोत ना?
मम्मामॅडम : (जावळातून हात फिरवत) मी मुहावरा वापरला बेटा! "दिल्ली दूर नही'चा अर्थ दिल्लीचं तख्त दूर नाही असा घ्यायचा! एकदा तुझ्या हातात पक्षाची अधिकृत सूत्रं दिली की मी मोकळी!!
बेटा : (गंभीर होत) मी आता ठरवलं आहे मम्मा! मी यापुढे कधीही विपश्‍यनेला जाणार नाही! मोठ्या सुट्ट्या मारून फॉरेनला जाणार नाही! कध्धीच गायब होणार नाही!! फुल टाइम पार्टीचं काम करणार!!
मम्मामॅडम : (कौतुकानं) मेरा लाल अब बडा हो रहा है!! शाब्बास!!
बेटा : (गोंधळलेल्या चेहऱ्यानं) आपले लोक मात्र मी फॉरेन टूरवर कधी जाणार, असं मला रोज विचारत असतात!
मम्मामॅडम : (समजूत घालत) अरे, आपला बॉस गावात नसला की कार्यकर्त्यांना बरंच वाटत असतं! तू लक्ष देऊ नकोस! त्यांना मोकळीक मिळावी, म्हणून हल्ली मीसुद्धा फारसं लक्ष घालत नाही! बघतोयस नं तू?
बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) सध्या तू पक्षाच्या कचेरीत येत नाहीस, त्यामुळे मला रोज जाऊन बसावं लागतं तिथं!
मम्मामॅडम : (गालगुच्चा घेत) तोच तर माझा गेम आहे!! कितना भी छिपाओ, ये मेरा हिरा कभी न कभी चमकेगाही!! आपल्या पक्षाचं वर्तमान आणि भविष्य तूच आहेस बेटा!!
बेटा : (उजळलेल्या चेहऱ्याने गाणे गुणगुणत) सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसुलोंसे...की खुशबू आ नहीं सकती कागज के फूलोंसे...हे गाणं ऐकलंयस तू?
मम्मामॅडम : (प्रश्‍नांकित चेहऱ्यानं) हे कुठलं गाणं?
बेटा : (खुलासा करत) काल मी ट्विट केलं होतं. सच्चाई छुप नही सकती, ये सच्चाई की आदत है!
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडत) पण ते आम आदमीवाल्यांसाठी होतं ना?
बेटा : (मान हलवत) नोप! ते माझ्यासाठीच होतं!! क्‍या समझे?
Web Title: dhing tang article