ढिंग टांग : सीएम मी होणार!

ब्रिटिश नंदी
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

स्थळ - मातोश्री हाइट्‌स, बांद्रे बुद्रुुक.
वेळ - सकाळची. प्रसंग - वर्तमानपत्रे वाचण्याचा.
पात्रे - महाराष्ट्राचे किंगमेकर मा. उधोजीसाहेब आणि महाराष्ट्राचे प्रिन्स चि. विक्रमादित्य.

(एरवी मा. उधोजीसाहेब स्वत-च्या दालनात असतात आणि चि. विक्रमादित्य दार ढकलून आत येतात. आता हवा बदलली आहे. या वेळी खुद्द उधोजीसाहेब प्रिन्समहाशयांच्या खोलीत शिरले आहेत. अब आगे...)

उधोजीसाहेब - (दारातून आत डोकावत) बाळा, आहेस ना?

विक्रमादित्य - (दाराकडे बघत) ओह बॅब्स... हाय देअर! तुम्ही आज माझ्या खोलीत आलात! थॅंक्‍यू! सूर्य आज पूर्वेला उगवला का?

उधोजीसाहेब - (आल्या आल्या खचून जात) सूर्य पूर्वेलाच उगवतो रे! अजून तरी!!

विक्रमादित्य - (अत्यंत पोक्‍त राजकारण्याच्या आविर्भावात) काय काम काढलं?

उधोजीसाहेब - (खवळून) अजून तू सीएम झालेला नाहीस! नीट बोल माझ्याशी!! 

विक्रमादित्य - मी होणार आहे ना पण बॅब्स?

उधोजीसाहेब - (पडेल आवाजात) काऽऽय?

विक्रमादित्य - (गाल फुगवून हसत) सीएम?

उधोजीसाहेब - (गोलमोल बोलत) बघू बघू!!

विक्रमादित्य - (पाय हापटत) बघू बघू काय? आता रडीचा डाव नाय खेळायचा हां! सांगून ठेवतोय!! आपलं आधीच ठरलंय ना?

उधोजीसाहेब - (समजूत घालत) अरे, ठरलंय हे कबूल... पण वेळ लागतो असल्या गोष्टींसाठी! राजकारण जमवावं लागतं! आपण मोर्चेबांधणी केली आहे! कमळाबाई काय म्हणते ते बघूया, असं म्हणतोय मी!! (हात चोळत) त्यात त्या बारामतीकरांनी घोळ केला, नाहीतर एव्हाना तुझं नाव जाहीर करून टाकलं असतं!

विक्रमादित्य - (निरागसपणे) काय घोळ केला बॅब्स?

उधोजीसाहेब - आपली बारगेन पॉवर घटवलीन! पण ते जाऊ दे! अजूनही संधी गेलेली नाहीए!! कमळाबाईला नाही झुकविले तर नावाचा उधोजी नाही!!

विक्रमादित्य - (गौप्यस्फोट करत) काल मला देवेंद्र अंकलचा फोन आला होता!

उधोजीसाहेब - (उडवून लावत) हंऽऽ...तो मलाही आला होता, त्यात काय? मलासुद्धा दिवाळीच्या छान शुभेच्छा दिल्या त्यांनी!!

विक्रमादित्य - (दुर्लक्ष करत) ते मला म्हणाले, ‘महाराष्ट्राचा पुढला सीएम तूच!!’

उधोजीसाहेब - (धक्‍का सहन न होऊन धडपडत) काय?...काय म्हणाले ते?

विक्रमादित्य - (शांतपणे) तुम्ही आत्ता ऐकलंत तेच! ‘महाराष्ट्राचा पुढला सीएम तूच!...’ असं म्हणाले ते मला!

उधोजीसाहेब - (विश्‍वास न बसून) अगदी तंतोतंत असं म्हणाले ते? तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील!

विक्रमादित्य - (गॅरंटी देत) अगदी अस्संच म्हणाले! मी त्यांना म्हटलं की मला ते माहीत आहे! मला बॅब्सनी कध्धीच सांगितलंय ते!! हाहा!!

उधोजीसाहेब - (सद्‌गदित होत) दिवाळीच्या याहून अधिक चांगल्या शुभेच्छा कुठल्या असतात? मी म्हटलं नव्हतं! देवेंद्र माझे या महाराष्ट्रातले सगळ्यांत जवळचे मित्र आहेत! ते असं म्हणाले असतील, तर पुढला सीएम तूच बरं! चिंतेचं कारणच मिटलं!!

विक्रमादित्य - (खांदे उडवत) त्यात चिंता करण्यासारखं काय आहे? सगळेच तसं म्हणतायत ना! पुढला सीएम मीच हे कित्येक वर्षांपूर्वी ठरलं आहे! मी तर ओथ सेरेमनीला घालायचा ड्रेस इस्तरीलासुद्धा टाकला!! 

उधोजीसाहेब - नवा शीव नवा! इस्तरी कशाला करतोस? बाय द वे, नेमकं काय म्हणाले देवेंद्रअंकल... जरा सांग ना!

विक्रमादित्य - (खुलासेवार सांगत) ते म्हणाले की ही माझी ही एवढी टर्म संपली की पुढला सीएम तूच..! 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article on Uddhav Thackeray