बालहट्ट! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 25 जुलै 2017

विक्रमादित्य : (पाय हापटत एण्ट्री घेत) बॅब्स...मे आय कम इन? 
उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत)...नोप! गुडनाईट!! 

विक्रमादित्य : (गंभीर चेहऱ्यानं) मला काही इंपॉर्टंट डिस्कस करायचं आहे! 
उधोजीसाहेब : (बसक्‍या घशाने) म्यारे...हॉन...म्लाख...हाहा...घहा...हुकलाय!! 

विक्रमादित्य : (कपाळाला आठ्या घालून) काय म्हणालात? 
उधोजीसाहेब : (घसा ताणून) म्यारेथॉन मुलाखती देऊन देऊन माझा घसा दमलाय आणि पाय सुकलेत! आय मीन...(पुन्हा घसा बसल्याने) जाऊ दे!! 

विक्रमादित्य : (पाय हापटत एण्ट्री घेत) बॅब्स...मे आय कम इन? 
उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत)...नोप! गुडनाईट!! 

विक्रमादित्य : (गंभीर चेहऱ्यानं) मला काही इंपॉर्टंट डिस्कस करायचं आहे! 
उधोजीसाहेब : (बसक्‍या घशाने) म्यारे...हॉन...म्लाख...हाहा...घहा...हुकलाय!! 

विक्रमादित्य : (कपाळाला आठ्या घालून) काय म्हणालात? 
उधोजीसाहेब : (घसा ताणून) म्यारेथॉन मुलाखती देऊन देऊन माझा घसा दमलाय आणि पाय सुकलेत! आय मीन...(पुन्हा घसा बसल्याने) जाऊ दे!! 

विक्रमादित्य : (भिवया वर ताणत) बॅब्स...माझा पॉइण्ट खूप इम्पॉर्टंट आहेऽऽऽ... 
उधोजीसाहेब : (अजीजीने) हे बघ, जिजामाता उद्यानातल्या तुझ्या पेंग्विनचा बर्थ डेसुद्धा साजरा केला! घरी केक कापला!! फुटबॉलचं मैदान तुझ्यासाठी खुलं करून दिलं!! तुला पाहिजे तिथे ओपन जिम बांधायला तू मुखत्यार आहेस!! आणखी काय हवं? जगातल्या सर्व इंपॉर्टंट गोष्टी तुला मिळाल्या आहेत की! 

विक्रमादित्य : (हाताची घडी घालून ठाम आवाजात) बॅब्स, तुम्ही अर्जंटली शिक्षणमंत्र्याकडून राजीनामा मागवा!! 
उधोजीसाहेब : (दचकून) शिक्षणमंत्र्याचा राजीनामा? का रे? 

विक्रमादित्य : (ठामपणाने) मी सांगतो म्हणून! आय रिअली वॉंट इट बॅडली!! 
उधोजीसाहेब : (उडवून लावत) तुला त्यांचा राजीनामा हवा असेल तर देवेंद्र अंकलना फोन करून सांग! ते त्यांचं काम आहे!! 

विक्रमादित्य : (हेटाळणीच्या सुरात) का? तुम्ही नाही मागू शकत राजीनामा? तुम्हाला तेवढी पॉवर नाही? एक साधा राजीनामा तो काय, तुम्ही का मागणार नाही? 
उधोजीसाहेब : (ताडकन अंथरुणातून उठत) खामोश! कोण म्हणतं आम्हाला पॉवर नाही? ह्या महाराष्ट्रात आम्हाला सोडून कोणाला पॉवर आहे मग? 

विक्रमादित्य : (खांदे उडवत) तुम्ही देवेंद्र अंकलकडे बोट दाखवलंत म्हणून म्हणालो!! 
उधोजीसाहेब : (दर्पोक्‍तीने) अरे, शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यासारखी साधी गोष्ट डायरेक्‍ट मी मागणं शोभतं का? मी मनात आणीन तर तुझ्या देवेंद्र अंकलचा राजीनामा मागीन!! देवेंद्र अंकल काय...(नाव चटकन न सुचल्याने) कोणाचाही मागीन!! 

विक्रमादित्य : (नाव सुचवण्याचा प्रयत्न) मोदीअंकलचा? 
उधोजीसाहेब : (गडबडून) एक बार मैने कमिटमेंट कर ली तो मैं खुद की भी नहीं सुनता!! समझे? 

विक्रमादित्य : (थंडपणाने) मग मागा ना...मागा राजीनामा!! 
उधोजीसाहेब : (कळवळून) का पण? बट व्हाय!! बरेत की रे ते शिक्षणमंत्री!! उगीच गडकिल्ले, बालभारती, दहावी, बारावी करत बसलेत!! चांगलं चाललंय त्यांचं!! उगीच कशाला राजीनामा मागायचा त्यांच्याकडे? 

विक्रमादित्य : (अत्यंत तिखट आवाजात) काहीही बरं चाललेलं नाही त्यांचं!! आमचे सगळे विद्यार्थी जाम वैतागलेत!! परीक्षा वेळेवर नाहीत, घेतल्या तर त्यात ढीगभर चुका!! वेळेवर पेपर तपासत नाहीत, रिझल्ट लावत नाहीत. उगीच मधे मधे सिलॅबस बदलतात!! ऍडमिशनचा घोळ सुरूच आहे...अशानं आम्ही विद्यार्थ्यांनी शिकावंच कसं, आणि कशाला? ते काही नाही...शिक्षणमंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे! 
उधोजीसाहेब : (समजूत घालत) एका दमात किती व्यवस्थित बोललास? बरं वाटलं!! 

विक्रमादित्य : (सीरिअस चेहरा करत) इतकं बेकार काम...मी त्यांच्याकडून राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!! 
उधोजीसाहेब : (हादरून) नको, नको!! आपण देवेंद्र अंकलकडे रीतसर तक्रार करू आणि शिक्षणमंत्र्यांचं खातं उन्हात बांधू हं!! तू आता झोपायला जा!! 

विक्रमादित्य : (विषण्ण आवाज लावत) झोपताय कसले? शिक्षण खातं झोपलंय, ते आधी जागं करा!! शिक्षण हाच खरा महाराष्ट्राचा समृद्धी महामार्ग आहे!! आणि त्यांचं घर उन्हात बिन्हात बांधायचं कारण नाही! जस्ट एक राजीनामा द्या म्हणावं!! 
उधोजीसाहेब : (टेकीला येत) बाबा रे!! राजीनामा कशाशी खातात हे तरी तुला माहितेय का? 

विक्रमादित्य : (निरागसपणाने विजयी मुद्रेने) अर्थात...मी सॉस बरोबर घेऊनच आलोय! हाहा!!

Web Title: Dhing Tang by British Nandi